हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीसारखे गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सजिव वाझे यांना 100 कोटी रुपये वुसलीचे टार्गेट दिले होते, असं सिंग यांनी आपल्या आरोपामध्ये म्हटलंय. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पत्राचा संबंध थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडला.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत येऊन गेल्यानंतर ते पत्र बाहेर पडले असं शरद पवार यांनी म्हंटल आहे. हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे. याचा कोणताही परिणाम सरकारवर होणार नाही,” असं पवारांनी स्पष्ट केलं.
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णय सर्वांशी चर्चा करुनच घेऊ. उद्यापर्यंत निर्णय घेतला जाईल. पण त्याआधी सर्वांशी चर्चा करण्यात येईल. गृहमंत्री अनिल देशमुख यांची बाजू जाणून घेऊनच निर्णय घेतला जाईल, असं शरद पवार यांनी सांगितलं. देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतली, असंदेखील पवारांनी स्पष्ट केलं. त्यामुळे उद्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group