महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणारच; शरद पवारांनी विरोधकांना ठणकावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर शंका घेणारे हे वेगळया नणंदवनात राहत असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे 5 वर्ष टिकणारच अस म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांना ठणकावले. तसेच शिवसेना हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष आहे असेही पवारांनी म्हंटल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. मुख्यमंत्री- पंतप्रधान एकांतात भेटले. त्यामुळे काही लोकांनी अनेक तर्कवितर्क लढवले. शंका घेतल्या. पण शंका घेणारे वेगळ्या नंदनवनात राहत आहेत. शिवसेना हा विश्वासहार्य पक्ष आहे. लोकांच्या विश्वासावर हे सरकार काम करत आहे. त्यामुळे हे सराकर नुसतं टिकणारन नाही तर पाच वर्षे टिकेल, असं पवार म्हणाले.

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येईल, असं लोकांना कधीच वाटलं नव्हतं. पण आपण एकत्र आलो. पर्याय दिला. लोकांनी हा पर्याय स्वीकारला असून आपली यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. कुणी काही म्हणो, सरकारची वाटचाल दमदार सुरू आहे, असंही शरद पवार यांनी म्हंटल.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.