भाजप ला पाठींबा दिलेल्या १८ नगरसेवकांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, शरद पवारांचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर | महापौरपदाच्या निवडणुकीत पक्ष श्रेष्ठींना अंधारात ठेवून भाजप ला पाठींबा दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली जाणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.

अहमदनगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांच्या पाठींब्यावर भाजपचा महापौर व उपमहापौर निवडून आला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची छुपी युती असल्याचा संदेश समाजात गेला होता. या प्रतिमेमुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी या नगरसेवकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

त्यामुळे चौकशी अहवालाची वाट न पाहता पक्षाने गेलेली पत परत मिळवण्यासाठी बंडखोर नगरसेवकांना पक्षातून काढून टाकायचे ठरवलेले असताना आ. संग्राम जगताप यांच्यावर देखील कारवाई होणार काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

 

इतर महत्वाचे –

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

Leave a Comment