हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज पुणे दौऱ्यावर आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातल्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना राऊतांनी जोरदार राजकीय बॅटिंग केली. यावेळी शिवसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे नेतृत्व करावे अस म्हंटल.
संजय राऊत म्हणाले, राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असले तरी मुख्यमंत्री ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांचे सरकार असते. सरकार आपले आहे. शिवसेना दोन्ही पक्षांच्या वर आहे. ही आपली पॉवर आहे’, असं म्हणत राऊतांनी सेनेची पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात शरद पवारांचेही कौतूक केले.
शरद पवार आपले आहेत. अजित पवार देखील आपले आहेत. शरद पवार तर आपलेच आहेत. पवार साहेब देशाचे नेते आहेत. देशाचं नेतृत्व त्यांनीच केलं पाहिजे असं आम्ही स्वत: म्हणत असतो असं संजय राऊतांनी म्हंटल.