हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगोला येथे जाऊन दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गणपतरावांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुखकर व्हावं यासाठी गणपतराव कायम आग्रही असायचे असे शरद पवारांनी म्हंटल.
यावेळी शरद पवार म्हणाले, गणपतराव देशमुख हे लोकांसाठी झटणारे माणूस होते. लोकांच्या प्रश्नांबद्दल अतिशय चिंता होती आणि त्यातला त्यात महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील पिण्याच्या व शेतीचा पाण्याचा प्रश्न जिथे भेडसावतोय, त्यासाठी अखंड चिंता आणि चिंतन या दोन्ही गोष्टी गणपतपरावांचं वैशिष्ट होतं. ग्रामीण भागातील जीवन सुखकर व्हावं यासाठी ते कायम आग्रही होते. त्यांच्या इतका स्वच्छ, चारित्र्यसंपन्न असा नेता असणं हे महाराष्ट्राचं भाग्य होतं अस म्हणत पवारांनी गणपतराव देशमुख यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
कोण आहेत गणपतराव देशमुख?
गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे . गणपतराव देशमुखांनी ११ टर्म आमदारकी भुषवली. सांगोल्यासारख्या अतिदृष्काळी तालुक्यात विकासाचा मळा फुलवला. शेकापच्या विळा आणि हतोड्याच्या झेंड्याप्रमाणं कामगार आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यात त्यांनी आग्रणी भूमिका घेतली.महाराष्ट्राच्या अनेक बड्या नेत्यांना उदय आणि अस्त त्यांनी पाहिलाय. २०१९ च्या विधानसभेनंतर त्यांनी राजकारणातून सन्यास घेतला.