शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण; औरंगजेब आणि रावणाचा दाखला देत विषयच संपवला …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात  नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमधेच 2 गट पडले असून काहींनी अमोल कोल्हे यांना विरोध केला आहे तर काही नेत्यांनी समर्थन करत कोल्हे यांची पाठराखण केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र अमोल कोल्हे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत त्यांची पाठराखण केली आहे

अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून ती भूमिका केली. अमोल कोल्हे यांनी ज्यावेळी भूमिका केली, त्यावेळी ते आमच्या पक्षातही केली, त्यांनी कलाकार म्हणून भूमिका केली म्हणजे त्यांनी गांधींविरोधात भूमिका आहे असा त्याचा अर्थ नाही. त्यामुळे कलाकार म्हणून कोल्हेंच्या या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे, असं पवार म्हणाले.

यावेळी शरद पवार यांनी रामायण आणि मुघलांच्या इतिहासाचा दाखल दिला. छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत जो औरंगजेबाची भूमिका करतो. त्यात तो मुघलांचा समर्थक होत नाही, किंवा रामराज्य सिनेमात रावणाची भूमिका केलेल्या कलावंताने सीतेचं हरण केलं होत, याचा अर्थ तो कलाकार रावण होता असं नाही असे शरद पवार यांनी म्हंटल.

Leave a Comment