शहाण्या माणसाबद्दल विचारा; पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा 4 शब्दात पाणउतारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्र्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य म्हंटल जाते. शरद पवार कोणत्याही विषयावर बोलताना अगदी तोलूनमापून बोलत असतात. पवारांनी केलेल्या प्रत्येक विधानाचे अनेक अर्थ निघतात असेही म्हंटल जाते. आज पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी अवघ्या 4 शब्दात नाव न घेता चंद्रकांत पाटलांचा पाणउतारा केला.

कसब्याचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. याच दरम्यान, शरद पवार यांना चंद्रकांत पाटील यांच्याविषयी एक प्रश्न विचारलं असता शहाण्या लोकांबद्दल प्रश्न विचारा असं म्हणत त्यांनी नाव न घेताच चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. पवारांच्या या उत्तराने पत्रकार परिषदेत हशा पिकला.

यावेळी शरद पवार यांनी रवींद्र धंगेकर यांचं कौतुक केलं. कसब्यात महाविकास आघाडी एकत्रितपणे लढल्यामुळे विजय मिळाला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं ते कशाचीही अपेक्षा न करता वर्षानुवर्ष सामान्य लोकांच्यात काम करणारे होते. आणि त्यांचे आणखी एक वैशिष्ठय म्हणजे हा उमेदवार कधी चार चाकीत कधी बसला नाही. दोन चाकीत बसला. त्यामुळे दोन पाय असलेल्या मतदारांचं सर्वांचं लक्ष यांच्याकडे होतं असं म्हणत पवारांनी धंगेकर यांच्यावर कौतुकाची थाप टाकली.