शरद पवार औरंगाबाद दौऱ्यावर; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार?

Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात होत असलेल्या राजकीय नाट्यापासून बाजूला असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आता ऍक्शन मोडवर आले आहेत. त्यांच्याकडून दोन दिवसांचा औरंगाबादचा दौरा केला जात आहे. दरम्यान त्यांच्याकडून कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाणार आहे. यावेळी ते आपल्या कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार? तसेच आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार घेऊन काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठवाड्याची राजधानी आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचे असलेल्या औरंगाबाद या शहरावर प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आता लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार आज शरद पवार हे औरंगाबाद शहारात दाखल होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्याच्या अनुशंगाने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

सध्या राज्यात भाजपकडून केल्या जात असलेल्या राजकारणामुळे म्हविकास अगदी सरकारच्या स्थित्वावर प्रश्नचिन्ह निर्णय झाले आहे. आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील नेत्यांकडून आपापल्या पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे. दरम्यान शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा राज्यभर सुरु केली आहे. या दरम्यान पक्षाला मजबूत करण्याबरोबरच तरुणांचे संघटन त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. दुसरीकडे मनसेचे अमित ठाकरे हे 17 जुलैपासून 8 दिवस मराठवाड्यात असणार आहे. तर राष्ट्रवादीचे शरद पवार आजपासून औरंगाबाद शहरात दाखल झाले आहे.