हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचं असेल तर विज्ञानाची साथ घेतली पाहिजे. आज माणूस चंद्रावर जातोय ते फक्त विज्ञानामुळेच अस म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विज्ञानाचे महत्त्व सांगितलं. बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे उद्घाटन पार पडले. यावेळी शरद पवार बोलत होते.
आपणा सगळ्यांनी वैज्ञनिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. विज्ञानाच्या आधारे विचार करण्याची मानसिकता तयार होणं गरजेच आहे. माणसाने विज्ञानाचा आधारावरच अनेक गोष्टी केल्या आहेत. आज माणूस चंद्रावर जाऊ शकतो याचे कारण फक्त विज्ञान आहे त्यामुळे विज्ञानाच्या मदतीने यश कस मिळवायचे हे समजलं पाहिजे अस शरद पवार म्हणाले.
दरम्यान, बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरच्या उद्घाटनावेळी प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांची मुख्य उपस्थिती होती. तसेच या उद्घाटनासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे आदि मान्यवर उपस्थित होते. बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात हे सायन्स पार्क उभारले आहे.