पवार- ठाकरेंनी काँग्रेसला गंडवलं, पृथ्वीराज चव्हाण अध्यक्ष होऊ नये म्हणून…?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यात मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये लेटर वॉर रंगल. राज्यपालांनी आवाजी मतदानावर आक्षेप घेतल्यानंतर महाविकास आघाडीने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या सर्व घडामोडींसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला गंडवलं असा थेट आरोप त्यांनी केला.

महाविकास आघाडीकडे १७० आमदार आहेत तर भाजपकडे १०५ आमदार आहेत. त्यामुळे गुप्त मतदान पद्धतीने का मतदान केले नाही. तसे करून पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्ष करता आले असते. मग का नाही केले मतदान, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. तसेच राज्यपालांना बळीचा बकरा बनवण्याचं काम शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

पृथ्वीराज चव्हाण किंवा काँग्रेसचा कोणी नेता विधानसभा अध्यक्ष नको होता म्हणून शरद पवार व उद्धव ठाकरेंनी आवाजी मतदानाचे नाटक केले का? असा सवाल सोमय्या यांनी केला. शरद पवार यांनीच काँग्रेसचा गेम केला असेही किरीट सोमय्या यांनी म्हंटल.

Leave a Comment