हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या राजकारणात एकामागून एक राजकीय घटना पाहायला मिळत असताना त्यात आज आणखी भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज आणि उद्या बंगळुरू येथे होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीला जाणार नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चाना उधाण आले आहे.
आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार 17 जुलै रोजी मुंबईत आपल्या आमदारांशी चर्चा करणार आहेत. त्यासाठी आज त्यांनी विरोधकांच्या बैठकीला पाठ फिरवली असून ते मुंबईतच थांबणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, कालच अजित पवार यांच्या सोबतच्या सर्व मंत्र्यांनी वायबी चव्हाण सेंटर वर जाऊन शरद पवार यांची प्रथमच भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ राहावी यासाठी आपण प्रयत्न करावा आणि आम्हाला मार्गदर्शन करा अशी विनंती सर्व मंत्र्यांनी पवारांना केली होती. अजित दादांच्या मंत्र्यांनी थेट शरद पवारांची भेट घेतल्याने खळबळ उडाली होती. त्यातच आज लगेच पवारांनी विरोधकांच्या बैठकीला जाण्याचे रद्द केल्यानंतर चर्चाना आणखी उधाण आले आहे.