शरद पवार महामोर्चात सहभागी होणार; सभेला संबोधित करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी कडून आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा होणारा अवमान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद या कारणांमुळे महाविकास आघाडी कडून मोर्चा पुकारण्यात आला आहे. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार की नाहीत याबाबत चर्चा सुरु होत्या, मात्र शरद पवार या महामोर्चात सहभागी होणार असून ते सभेला संबोधित करणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.

शरद पवार हे ११ वाजताच्या सुमारास यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पोहोचतील. त्यानंतर दुपारी साधारण साडेबारा वाजता ते महाविकास आघाडीचा मोर्चा टाईम्स ऑफ इंडिया कार्यालयापाशी पोहोचल्यानंतर या मोर्चाच्या समारोपावेळी आयोजित सभेस उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित करतील. शरद पवार मोर्चाला उपस्थित राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नवं बळ आणि ऊर्जा मिळू शकते.

दरम्यान, महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यांविरोधात कोणतीही भूमिका न घेतल्यानं शरद पवारांनी खंत व्यक्त केली. राज्य आणि केंद्र सरकारनं याबाबत जी काळजी घ्यायला हवी होती ती काळजी न घेता फक्त बघ्याची भूमिका आहे. त्यामुळं लोकांमध्ये संताप असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं होते.

कुठून कुठपर्यंत आहे मोर्चा –

भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.

कोणकोणते पक्ष मोर्चात सहभागी होणार?

शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
समाजवादी पक्ष
भारतीय कम्युनिष्ट पक्ष
मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष
शेतकरी कामगार पक्ष
भीमशक्ती रिपब्लिकन