अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट इतिहासाचीच आठवण करून देत दिला स्पष्ट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा जास्त समर्थक आमदारांसह पक्षातून बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आजचा हा प्रकार इतरांसाठी नवा असेल, पण माझ्यसाठी नवीन नाही असं म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांना इतिहासाची आठवण करून देत थेट इशारा दिला आहे. तसेच जे पक्षाच्या चौकटीच्या बाहेर गेले, त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.

शरद पवार म्हणाले, जे घडले त्यामुळे मी चिंतेत नाही. याआधीही 1980 असा प्रकार घडला होता. १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो. त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. एक महिन्यानंतर त्या ५८ पैकी फक्त ५ आमदार माझ्या सोबत राहिले, बाकीचे सोडून गेले. परंतु त्यानंतरच्या निवडणुकीत आमच्या जे सोडून गेले ते सर्व पराभूत झाले आणि आमच्या आमदारांची संख्या ५ वरून ६९ वर गेली असं शरद पवारांनी म्हंटल.

अजित पवार यांच्यासोबत जे काही आमदार आहेत त्यांच्यातील काही लोकांनी माझ्याशी आजच संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे असं मला सांगितलं आहे. परंतु त्या आमदारांनी मीडियासमोर खुलासा करावा असेही शरद पवार यांनी म्हंटल. जर त्यांनी असं सांगितलं नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढणार असल्यांच पवार म्हणाले. कोणाला पक्षावर आणि चिन्हावर दावा करायचा त्यांना करुद्या, आम्ही न्यायालयात जाणार नाही, आम्ही थेट जनतेमध्ये जाऊन आमची भूमिका मांडू असं शरद पवार म्हणाले

यावेळी शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी मोदींनी राष्ट्र्रवादी काँग्रेसवर भ्रष्ट्राचाराचा आरोप केला आणि त्याच लोकांना आज शपथ देऊन मोदींनी एकप्रकारे त्यांची आरोपातून मुक्त केलं याबद्दल त्यांचे आभार मानतो असा खोचक टोला पवारांनी लगावला.