हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज Share Market सलग पाचव्या दिवशी घसरणीने बंद झाला. आजच्या ट्रेडिंगमध्ये बँकिंग, रियल्टी शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली, तर एफएमसीजी, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये प्रचंड दबाव आला. त्याच वेळी मेटल, पीएसई, फार्मा आणि एनर्जी शेअर्स वाढीने बंद झाले. आज ट्रेडिंगच्या शेवटी सेन्सेक्स 344.29 अंकांनी म्हणजेच 0.59 टक्क्यांनी घसरून 57,555.90 वर बंद झाला. तर निफ्टी 71.15 अंकांनी किंवा 0.42 टक्क्यांनी घसरून 16,972.15 च्या पातळीवर बंद झाला.
आजच्या ट्रेडिंगमध्ये भारती एअरटेल, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचयूएल आणि नेस्ले इंडिया टॉप लुझर्स तर अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, टाटा स्टील आणि टायटन कंपनी हे टॉप गेनर्स ठरले. Share Market
हे जाणून घ्या कि, मंगळवारी देखील सेन्सेक्स 337.66 अंकांनी म्हणजेच 0.58 टक्क्यांनी घसरून 57,900.19 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 111.00 अंकांच्या म्हणजेच 0.65 टक्क्यांच्या घसरणीने 17,043.30 च्या पातळीवर बंद झाला. Share Market
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ने 15 मार्चपासून आपला बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) 70 बेस पॉइंट्स किंवा 0.7 टक्क्यांनी वाढवून 14.85 टक्के केला आहे. सध्याचा बीपीएलआर 14.15 टक्के आहे. बँकेने मूळ दर देखील सध्याच्या 9.40 टक्क्यांवरून 70 bps ने वाढवून 10.10 टक्के केला आहे. याआधीही 15 डिसेंबर 2022 रोजी SBI ने आपल्या बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट आणि बेस रेट मध्ये सुधारणा केली होती. Share Market
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/benchmark-prime-lending-rate-historical-data
हे पण वाचा :
Flipkart च्या बिग सेव्हिंग डेज सेलमधून सोनीचा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करण्याची संधी
SBI ने प्राइम लेंडिंग रेट अन् बेस रेटमध्ये केली 70 bps ने वाढ, ‘या’ ग्राहकांना बसणार फटका
BSNL ने आणला जबरदस्त प्लॅन, 5 महिन्यांसाठी सर्व काही मोफत
फक्त विना तिकीट प्रवासच नाही तर ‘या’ चुकांसाठीही Railway कडून दिली जाते शिक्षा
देशभरात प्रवास करताना ‘या’ लोकांना द्यावा लागत नाही Toll Tax, पहा संपूर्ण लिस्ट