हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात चांगलीच तेजी दिसून आली. जूनमध्ये मोठ्या घसरणीनंतर जुलैमध्ये बाजारात वाढ झाली. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 1700 हून जास्त अंकांनी वाढला आहे. शुक्रवारी सेन्सेक्स 303.38 अंकांनी म्हणजेच 0.56 टक्क्यांच्या वाढीसह 54,481.84 वर बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 87.70 अंकांनी किंवा 0.54 टक्क्यांनी वाढून 16,220.60 वर बंद झाला.
जवळपास महिन्याभरानंतर निफ्टी पुन्हा 16,000 च्या पातळीवर परतला आहे. हे लक्षात घ्या कि, एक महिन्यापूर्वी निफ्टी 16,000 च्या खाली आला होता. मात्र आता निफ्टी 50 पुन्हा या पातळीच्यावर ट्रेड करत आहे. त्याचबरोबर निफ्टी बँक देखील आता 35,000 च्या वर ट्रेड करत आहे. गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 6.30 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या दरम्यान, बीएसई सेन्सेक्स 1,300 हून जास्त अंकांनी वाढला. बाजारातील वाढीसह, BSE वर लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 6,30,479.15 कोटी रुपयांनी वाढून 2,51,59,998.80 कोटी रुपये झाली. Share Market
गेल्या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांची विक्री देखील कमी झाली आहे. तसेच क्रूडच्या किंमती घटल्याने बाजाराला चांगला सपोर्ट मिळाला. ज्यामुळे बाजाराला तेजी मिळाली. मात्र, तज्ञ अजूनही बाजारातील अनिश्चितता आणि अस्थिरतेकडे पाहत आहेत. आता विदेशी गुंतवणूकदारांची विक्री, कच्च्या तेलाची विक्री आणि त्रैमासिक निकाल यावर बाजाराची पुढील वाटचाल ठरेल. Share Market
भारतीय शेअर बाजारासाठी जून महिना अत्यंत कठीण गेला आहे. यादरम्यान देशांतर्गत बाजारात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आणि गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. जूनच्या सुरुवातीला सेन्सेक्स 55,500 च्या वर होता. मात्र 20 जूनपर्यंत तो जवळपास 4000 अंकांनी घसरला. सेन्सेक्सने 51,500 च्या पातळीवर ट्रेड सुरू केले. त्यानंतर थोडी रिकव्हरी झाली, मात्र जूनअखेर सेन्सेक्स 53000 च्या खाली राहिला. म्हणजे जवळपास 2500 अंकांची घसरण झाली. Share Market
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/
हे पण वाचा :
Bank FD : आता ‘या’ बँकेच्या FD वर मिळणार जास्त व्याज, नवे दर तपासा
LPG दर वाढीमुळे बिघडले सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजट !!!
RBI ने ‘या’ को-ऑपरेटिव्ह बँकेवर घातली बंदी, यामागील कारण जाणून घ्या
Indian Overseas Bank चा ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार
Home Loan : कोणत्या बँकेकडून कमी व्याजदरात होम लोन दिले जात आहे ते जाणून घ्या