व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘शरीराने शिवसेनेत अन् मनाने राष्ट्रवादीत’, केसरकरांची संजय राऊत यांच्यावर टीका

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेतील आमदारांनी जी बंडखोरी केली त्याचे मुख्य कारण म्हणजे संजय राऊत. बंडखोरीच्या पहिल्या दिवसांपासून संजय राऊत यांची वक्तव्य आणि त्यांनी केलेली टोकाची टिप्पणी यामुळेच ही परस्थिती ओढावल्याचे दिसत आहे. यादरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) आणि संजय राऊत यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे. शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे सांगणारे राऊत हे शरीराने शिवसेनेत तर मनाने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असल्याचा आरोप दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी केला आहे. या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप यामुळे शिंदे गट आणि शिवसेनेतील अंतर वाढत चालले आहे. आम्ही नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा चेहरा घेऊन जनतेसमोर गेलो होतो. यामध्ये कुणाचाही संबंध नसल्याचे म्हणत संजय राऊत यांना दीपक केसरकर यांनी फटकारले आहे.

किरीट सोमय्यांच्या विधानावर आक्षेप कायम
उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुख आहेत शिवाय आमचे ते नेते राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी खालच्या स्तराला जाऊन टीका करणार असेल तरी ती सहन केली जाणार नाही. त्यामुळे याबाबतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे. तर याबाबतची भूमिका ही लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे केसरकर (Dipak Kesarkar) यांनी सांगितले आहे.

सोमय्या हे उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलणार नाही
किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माफिया असा केला होता. त्यावरुन शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवाय प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांच्याशी बोलणे झाले असल्याचे सांगितले आहे. शिवाय भविष्यात ते उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलणार नाहीत असेदेखील दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी सांगितले आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?