हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : सध्या शेअर बाजारात जोरदार घसरण होत आहे. ज्यामुळे बाजार गेल्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आलं आहे. मात्र इथे काही असे शेअर्स देखील आहेत ज्यामध्ये नेहमी वाढच होत असते. पेंट कंपनीचे शेअर्सही याच श्रेणीमध्ये येतात. हे जाणून घ्या कि एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स आणि कानसाई पेंट्स सारख्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत रिटर्न दिला आहे.

एका मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले आहे की, या कंपन्यांनी दर 3 वर्षांनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या कंपन्यांच्या गेल्या 15 वर्षांच्या रोलिंग रिटर्न्सच्या आधारे हा निकाल काढण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, रोलिंग रिटर्न हे इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा जास्त अचूक मानले जातात. Share Market

15 वर्षांत दिला 3000 हजार टक्क्यांहून जास्त रिटर्न
3 वर्षांच्या रोलिंग रिटर्न्सच्या आधारे बर्जर पेंट्सची कामगिरी सर्वोत्तम असल्याचे दिसून येते. या शेअर्सने जवळपास 70 टक्के वेळा 100 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. जर आपण 15 वर्षांकडे बघितले तर बर्जर पेंट्सने 3244 टक्के रिटर्न दिला आहे. तर दुसरीकडे एशियन पेंट्सचा गेल्या 15 वर्षांतला रिटर्न 3038 टक्के होता. त्याबरोबरच कानसाई पेंट्सने 1006 टक्के रिटर्न दिला. त्याच वेळी, निफ्टीने या कालावधीत 261 टक्के रिटर्न दिला. Share Market

नफा कमी खर्च जास्त
गेल्या 15 वर्षामध्ये पेंट्स इंडस्ट्रीतही अनेक बदल झाले . या काळात बाजारात अनेक कंपन्या सुद्धा दाखल झाल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांचा बाजारातील हिस्सा देखील कमी झाला आहे. यासोबतच खर्चात वाढ झाल्याने नफाही कमी झाला आहे. Share Market

शेअर्समध्ये या वर्षी 25 टक्क्यांनी घसरण
मात्र, हे लक्षात घ्या कि सध्याच्या बाजारातील घसरणीमुळे पेंट्स कंपन्यांचे शेअर्सही घसरत आहेत. एशियन पेंट्समध्ये या वर्षी 22 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर बुधवारी हा शेअर 2658 रुपयांवर ट्रेड करत होते. बर्जर पेंट्स या वर्षी 25 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. बुधवारी त्याचे शेअर्स 580 रुपयांच्या आसपास ट्रेड करत होते. Share Market
या बरोबरच तज्ज्ञांनी असे म्हंटले आहे की, एकदा का बाजारातील घसरण थांबली तर पेंट्स कंपन्यांचे शेअर्स भविष्यात चांगला रिटर्न देऊ शकतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.asianpaints.com/
हे पण वाचा :
किसान विकास पत्रामध्ये TAX कसा आकारला जातो ??? अशा प्रकारे समजून घ्या
ICICI Bank कडून 6 दिवसात दुसऱ्यांदा FD वरील व्याजदरात वाढ, सुधारित दर जाणून घ्या
PF Account : आता घरबसल्या अशा प्रकारे जनरेट करा UAN नंबर !!!
Gold Price Today : जागतिक बाजारातील नरमाईमुळे आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण !!!
IRCTC खाते आधारशी ऑनलाइन लिंक करण्यासाठीची प्रोसेस समजून घ्या




