नवी दिल्ली । आठवड्याच्या चौथ्या ट्रेडिंगच्या दिवशी गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात वाढीने झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई सेन्सेक्स 112 अंकांच्या वाढीसह 58,795 वर उघडला, तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच एनएसई निफ्टीने 41 अंकांची उसळी घेत 17,539 पातळीवर ट्रेड सुरू केला. ट्रेडिंगच्या शेवटी, सेन्सेक्स 115.48 अंकांच्या किंवा 0.20 टक्क्यांच्या घसरणीसह 58,568.51 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 33.50 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 17,464.75 वर बंद झाला.
एका दिवसापूर्वी सेन्सेक्सने 740 अंकांची उसळी घेतली
याआधी बुधवारी सेन्सेक्स 740 अंकांच्या वाढीसह 58683.99 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 172.95 अंकांच्या वाढीसह 17,498.25 वर बंद झाला. बँक निफ्टीमध्ये वाढ झाली आणि तो 486.90 अंकांच्या वाढीसह 36334.30 वर बंद झाला.
टाटा सन्सने TCS मधील 0.7% हिस्सा विकला
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या प्रमोटर असलेल्या टाटा सन्सने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या नुकत्याच संपलेल्या शेअर बायबॅक योजनेत कंपनीचे 2.48 कोटी शेअर्स विकले. अशाप्रकारे टाटा सन्सने TCS मधील 0.7% हिस्सा विकला आहे.
आज रात्री 12 नंतर 65 रुपयांपर्यंत जास्त टोल टॅक्स भरावा लागणार आहे
सर्व बाजूंनी महागाईने आक्रमण केल्याचे दिसते. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत, सीएनजीही गेल्या 6 महिन्यांत 30 टक्क्यांहून जास्त महागला आहे, खाद्यपदार्थांच्या किंमतीही वाढल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता 1 एप्रिलपासून टोल प्लाझावर जाणे पूर्वीपेक्षा महागणार आहे. टोल प्लाझाचे दर 10 रुपयांवरून 65 रुपयांपर्यंत वाढणार आहेत.
1 एप्रिलपासून ‘या’ वस्तू महागणार
तंबाखू, पान मसाला आणि सिगारेटप्रेमींनाही सरकारने मोठा दणका दिला आहे. 2022 च्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींमुळे या उत्पादनांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढणार आहेत. वास्तविक, सरकारने तंबाखू आणि पान मसाला यांसारख्या वस्तूंवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. त्याचा परिणाम कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर दिसून येईल. याची भरपाई करण्यासाठी कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवतील, ज्याचा थेट परिणाम तंबाखू किंवा पान मसाला वापरणाऱ्या ग्राहकांवर होईल. मात्र, सरकारने अर्थसंकल्पात सिगारेटवरील उपकर किंवा जीएसटी दर वाढवण्यास नकार दिला होता.