हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : आज भारतीय शेअर बाजारात जोरदार वाढ पाहायला मिळाली. आज सलग तिसऱ्या दिवशी बाजारपेठेत हिरवाई दिसून आली. जागतिक बाजारातील चांगले संकेत आणि डॉलर इंडेक्समधील घसरणीमुळे आज बाजारात तेजीचा कल दिसून आला. त्याचबरोबर सर्व दर्जेदार शेअर्स आकर्षक मुल्यांकनात उपलब्ध झाल्यामुळे बाजारात जोरदार खरेदी झाली. त्याचा परिणाम बाजारावर दिसून आला. गेल्या तीन ट्रेडिंग सेशन मध्ये आलेल्या तेजी मुळे गुंतवणूकदारांच्या झोळीत एकूण 10 लाख कोटी रुपयांनी वाढ झाली.
सोमवारी सेन्सेक्स 1041.08 अंकांनी वाढून 55925.74 च्या पातळीवर तर निफ्टी 308.95 अंकांच्या वाढीसह 16661.40 वर बंद झाला. बँक निफ्टीही 213.65 अंकांनी वाढून 35826.95 वर बंद झाला. गेल्या तीन सत्रात सेन्सेक्स र्ब्ब्ल 2100 अंकांनी वर गेला आहे. Share Market
याशिवाय स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्येही जोरदार वाढ झाली आहे. सोमवारीही हे दोन्ही इंडेक्स 2 टक्क्यांहून जास्त वाढीने बंद झाले. गेल्या तीन दिवसांत BSE वर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 10 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आज सोमवारी BSE वर लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 258.48 लाख कोटी रुपये होती. Share Market
सोमवारी, आयटी इंडेक्समध्ये सुमारे 4 टक्क्यांची वाढ झाली तर याच क्षेत्रात काही दिवसांपूर्वी सर्वात मोठी विक्री दिसून आली. आजच्या ट्रेडिंग मध्ये ऑटो क्षेत्रातही तेजी दिसून आली.
शेअर बाजाराच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/
हे पण वाचा :
BSNL ची खास ऑफर !!! एकदाच रिचार्ज करून मिळवा 1 वर्षापेक्षा जास्त व्हॅलिडिटी
Zomato Share : गेल्या पाच दिवसात ‘या’ शेअर्सने घेतली 26% उडी !!! तज्ज्ञांचे काय मत आहे ते पहा
LPG Price : 1 जून पासून पुन्हा वाढू शकतात एलपीजीच्या किंमती !!!
ATM Card हरवले ??? कार्ड कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या
Business Idea : कमी पैशांत ‘या’ व्यवसायाद्वारे करा भरपूर कमाई !!!