हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Suzlon Energy : आज शेअर बाजारात ट्रेडिंगच्या सुरुवातीलाच सुझलॉन एनर्जीचे शेअर्स सर्वाधिक फोकसमध्ये होते. यामागील कारण असे कि, आता कंपनीला शेअर्सच्या राइट इश्यूद्वारे 1,200 कोटींचा निधी उभारण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाकडून मान्यता मिळाली आहे. नवीन एक्सचेंज फाइलिंगनुसार, कंपनीच्या संचालक मंडळाकडून 240 कोटी इक्विटी शेअर्स प्रति शेअर 5 या दराने जारी करण्यास मान्यता दिली गेली आहे. सोमवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सची किंमत 8.60 रुपये होती. आता हे शेअर्स राइट्स इश्यू द्वारे सुमारे 45 टक्के सवलतीने खरेदी करता येतील.
शेअर बाजारांना दिलेल्या माहितीमध्ये कंपनीने सांगितले की, 25 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाकडून 240 कोटी शेअर्स जारी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. मात्र हे लक्षात घ्या कि, राइट्स इश्यूद्वारे फक्त सध्याच्या भागधारकांनाच हे शेअर्स खरेदी करता येतील. यावेळी कंपनी प्रत्येकी 2 रुपये किंमतीचे 240 कोटी शेअर्स 5 रुपये प्रति शेअर या दराने ऑफर करणार आहे. अशा प्रकारे शेअर्सची विक्री करून कंपनी 1,200 कोटी रुपये उभारेल. Suzlon Energy
1 महिन्यात 11 टक्के रिटर्न
Suzlon Energy ने यावेळी सांगितले की,” 21 पूर्ण पेड इक्विटी शेअर्ससाठी भागधारकांना 5 राइट्स शेअर्स जारी केले जातील. याचा अर्थ असा कि, सध्याच्या भागधारकांना 21 शेअर्सवर 5 इश्यू राइट्स खरेदी करता येतील.” कंपनीने पुढे सांगितले की, जर कोणत्याही पात्र इक्विटी भागधारकाचे शेअरहोल्डिंग 5 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा भागधारकास किमान 1 इक्विटी शेअर मिळेल.
चुकीमुळे 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट
हे लक्षात घ्या कि, 2022 दरम्यान Suzlon Energy चे शेअर्स धारकांचे पसंतीचे ‘सेल ऑन राइज’ स्टॉक राहिले आहेत. गेल्या एका महिन्यात या शेअर्सने जवळपास 11 टक्के रिटर्न दिला आहे. मात्र वर्ष-दर-वर्षाच्या आधारावर, यामध्ये सुमारे 15 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याच वेळी, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला, टायपिंगमध्ये झालेल्या चुकीमुळे Suzlon Energy च्या स्टॉकला 20% चे अप्पर सर्किट बसले.
IPO पेक्षा राइट्स इश्यू कसे वेगळे आहे ???
हे लक्षात घ्या कि, IPO पेक्षा राइट्स इश्यू हा वेगळा असतो. कोणत्याही नवीन गुंतवणूकदाराला IPO खरेदी करता येते. यासाठी कोणतेही लिमिट नाही. स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असलेली कोणतीही कंपनी अतिरिक्त पैसे उभारण्यासाठी राइट्स इश्यू आणते. असे राइट्स इश्यू फक्त कंपनीच्या सध्याच्या भागधारकांनाच खरेदी करता येतात. मात्र हे शेअर्स किती प्रमाणात आणि किती दिवसांत दिले जातील याचा निर्णय कंपनीचे बोर्डच घेते. Suzlon Energy
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/suzlon-energy-ltd/suzlon/532667/
हे पण वाचा :
Maruti Suzuki Grand Vitara : मारुती सुझुकीची Grand Vitara लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स
EPFO : पीएफ खाते क्रमांकामध्ये लपली आहे ‘ही’ खास माहिती, त्याविषयी जाणून घ्या
Suryoday Small Finance Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा !!!
Bank Holiday : पुढील महिन्यात 21 दिवस बँका राहणार बंद !!! सुट्ट्यांची लिस्ट पहा