Thursday, March 30, 2023

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे?

- Advertisement -

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची निवड होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष येणार अशी चर्चा सुरू होती. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांची देखील या पदासाठी चर्चा सुरू होती मात्र त्यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना अल्प मताने पराभवाला सामोरे जावे लागले. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत मात्र यावेळेस त्यांना अल्पमताने पराभव पत्करावा लागला. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वपूर्ण नेते अशी शशिकांत शिंदे यांची ओळख आहे. त्यांना मिळालेलं हे प्रदेशाध्यक्ष पद त्यांच्या पक्षनिष्ठेचे फळ असल्याचे बोलले जात आहे. आघाडी सरकारच्या काळात ते जलसंसाधन खात्याचे मंत्री होते. 30 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -