सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानास आज सकाळी मेढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या इमारतीत सुरुवात झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषीकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आमने सामने भिडले. यावेळी दोन्ही गटात राडा झाला. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना रोखले. यानंतर शशिकांत शिंदे घटनास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी मोठे अन अगदी सूचक वक्तव्य केले आहे. मी गाफील राहिलो म्हणूनच निवडणूक लागली असे शिंदे म्हणाले आहेत.
आज सोसायटी आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून मतदान होत होते. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोर आले. शंभर मित्राच्या आत मध्ये दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आहेत हे दिसल्यानंतर ऑब्जेक्टिव घेण्यात आले. फार मोठा राडा वगैरे काही झाला नाही. मला हि गोस्ट कळल्यानंतर मी तिथे गेलो. मी गेल्यानंतर ते सर्व प्रकरण मिटले असे शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मी प्रामाणिउक प्रमाणे सांगतो यामध्ये शरद पवार माझे दैवत आहेत, अजितदादा माझे आधारस्तंभ आहेत. या सर्वांनी योग्य पद्धतीने निर्णय व्हावा यासाठी प्रयत्न केले. मात्र त्याला यश आले नाही. मी गाफील राहिलो. शिवेंद्रराजेंकडून निवडणूक थांबवण्यासाठी प्रयत्न केले गेले काय? असा प्रश्न विचारला असता त्यांनी प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही असे शशिकांत शिंदे म्हणाले.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी मी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यातून कोणाच्या भावना दुखवल्या जात असतील तर माझा नाईलाज आहे. यापूर्वी जावळीत मी लक्ष घातले नव्हते. परंतु आता जावळीत राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याकरिता आता मी स्वतः लक्ष घालणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केले. दरम्यान भाजप आमदार शिवेंद्रसिंहाराजे भोसले यांनी माझ्यासाठी प्रयत्न केल्याचे शिंदेंनी नमूद केले.
जावळीतील जनता १०० टक्के माझ्या पाठीशी आहे, असे सांगून आमदार शिंदे म्हणाले, काही स्वार्थी लोक आहेत, ते गेले. आम्ही पुन्हा येथे राष्ट्रवादीची ताकद उभी करु. माझे भाग्य आहे की जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जिल्हाभरातील सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले आहेत.
ज्येष्ठ नेत्यांनी सांगूनही काहींनी ऐकले नाही. त्याचा योग्य वेळीस खूलासा केले जाईल. मी पक्षाचा एकनिष्ठ आहे. माझ्या पक्षासाठी मी लढत राहतो. सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांची नाळ माझ्याशी जोडली गेली आहे. भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तुमच्यासाठी प्रयत्न केला का, याविषयी ते म्हणाले, त्यांना मानणा-या कार्यकर्त्यांनी त्यांचे का ऐकले नाही, याचा उलगडा होत नाही. त्यांनी प्रयत्न केला ही वस्तुस्थिती आहे. प्रयत्न केल्याने लोक मानत नसतील तर उद्याचा संघर्ष हा त्या लोकांबरोबर असेल, त्यांनी नमुद केले.