सातारा : जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवरुन साता-यात बरंच काही घडुन गेलय भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे यांनी शरद पवार ओचार यांची भेट घेवुन अध्यक्ष बनवण्याची विनंती केली होती. मात्र या सगळ्यांना फाटा देत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या भवितव्याकडे पहात नितीन पाटील यांना जिल्हा बँकेच अध्यक्ष बनवलं .
जिल्हा बँकेचे निवनिर्वाचित अध्यक्ष नितीनकाका पाटील यांना शशिकांत शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या असुन जिल्हा बँकेत नेहमीच पक्ष विरहीत कामकाज चालत असं त्यांनी सांगियलय स्व. लक्षमणतात्या पाटील यांनी काय पक्षाशी बांधीलकी ठेवत शदर पवार यांच्या विचारांची पाठराखन केली होती. त्यामुळे त्यांच्या मुलाला अध्यक्ष बनविलं याचा आनंदच असुन कार्यकर्त्यांना सुद्धा समाधान झालं असेल असं शशिकांत शिंदे म्हणालेत.
माझ्या पराभवा नंतर कार्यकर्त्यांच्या भावना तिव्र होत्या आणि याच पवार साहेबांनी ओळखल्या. त्यामुळेच नितीन पाटील यांना अध्यक्ष बनविल्याच्या भावना शिंदे यांनी बोलुन दाखवल्या आहेत.
शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजे यांच्या विरोधात खोचक वक्तव्य केलं असुन मी निवडुन आलो असतो तर शिवेंद्रराजेंची शिफारस पवार साहेबांच्याकडे करु शकलो असतो या आधी शिवेंद्रराजे भोसले हे अध्यक्ष झाले होते तेव्हा सुद्धा पवार साहेबांच्याकडे मीच शिफारस केली होती. यावेळी माझाच पराभव झाल्यामुळे माझ्यासारख्याची शिफारस कमी पडली त्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होवु शकले नाहीत असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लागावलाय.
तसंच शरद पवार यांना मी शिवेंद्रराजेंना अध्यक्ष करु नका अस कधीच सांगितलं नसल्याचंही ते म्हणालेत . राष्ट्रवादी सातारा जिल्ह्यात टिकवायची असेल तर जिल्ह्यात नेत्यांनी एकत्र येवुन काम केलं पाहीजे राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यात टिकवण्यासाठी मी वाट्टेल ते करायला तयार आहे फक्त पक्षाने तसे आदेश दिले पाहीजेत असं सांगत सातारा- जावली मतदारसंघात पक्षाने आदेश दिला तर नक्की रान पेटवेन असं ही सांगितलय त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमीत्ताने पेलटला हा वनवा विझण्यापेक्षा अधीकच भडकत चाल्लेला पहायला मिळयोय. शशिकांत शिंदे यांच्या या खोचक वक्तव्यावर आमदार शिवेंद्रराजे भोसले काय उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.