अनैतिक संबंधाच्या संशयावरून चुलत्याने पुतण्याचा भर चौकात कोयत्याने केला खून

सांगली : वाळवा तालुक्यातील येलूर येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून पुतण्याचा भरदिवसा कुराड व कोयत्याने मानेवर वार करून खून केल्याप्रकरणी दोघांना कुरळप पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना भरदिवसा भरचौकात घडल्याने येलूर गावात शुकशुकाट पसरला होता.

सोमवारी दुपारी येलूर येथील वारणा बाजारच्या समोर हा प्रकार घडला. या प्रकरणी चुलतभाऊ प्रवीण पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आनंदराव सावळा पाटील व अमोल आनंदराव पाटील या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर रणजीत रमेश पाटील खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मृत रणजीत पाटील याचे सुनेशी बळजबरी अनैतिक संबंध असल्याचा संशय आनंदराव पाटील व मुलगा अमोल पाटील यांना होता. त्यावरून गत काही महिन्यापूर्वी वादावादीही झाली होती. मात्र, पोलिसांनी व स्थानिक संबंधितांनी रणजीतला समज दिली होती. तरीही रणजीत याचा सतत त्रास सुरू होता.

दरम्यान, आज रणजीत हा दुपारी चौकात आल्यानंतर आनंदराव व अमोल पाटील या दोघांनी त्याच्यावर कोयत्याने व कुर्‍हाडीने माने वरती वार करून त्याला खाली पाडले. रणजित रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. जखमी रणजित याला रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलीस दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरु केला आहे.

You might also like