महाराष्ट्रात शत्रुघ्न सिन्हा करणार विरोधकांना ‘खामोश’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष कंबर कसून तयारीत आहेत. भाजपा-शिवसेनेबरोबरच विरोधी गोटातील काँग्रेस-राष्ट्रवादीनेही स्टार प्रचारकांची फळी राजकीय आखाड्यात उतरवली आहे. काँग्रेसने पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह तब्बल चाळीस प्रचारकांची घोषणा केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या कार्यपद्धतीवर टीका करीत भाजपातून बाहेर पडलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांचं नाव पहिल्या वीस प्रचारकांच्या यादीत आहे.

तेव्हा, एकेकाळी भाजपची स्टार शॉटगन असणारे शत्रुघ्न सिन्हा आता काँग्रेसच्या बाजूने विरोधकांना खामोश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक प्रचाराच्या राजकीय शिमग्यात विरोधाकांना प्रचारात नामोहरम करण्यासाठी शत्रुघ्न सिन्हांच्या रूपाने काँग्रेसला त्याच्यासाठी नवा चेहरा मिळाला आहे.

तब्बल तीन दशकांहून अधिक काळ भाजपात असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शत्रुघ्न सिन्हा यांनी पाटना साहिब मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व केलं आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रात त्यांनी मंत्रिपदही भूषवलं होतं. मात्र, भाजपमध्ये मोदीच्या नेतृत्वाखाली कारभार सुरू झाल्यापासून ते राजकीयदृष्ट्या अडगळीत पडले होते. त्यामुळे ते सातत्याने पक्षश्रेष्ठीवर टीका करत होते. तसेच भाजपात असतानाच त्यांनी विरोधकांच्या व्यासपीठांवरही हजेरी लावायली होती.

इतर काही बातम्या-