हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी शिंदे- फडणवीस सरकार एक नवी योजना आणणार आहे. यापूर्वी सरकारने 65 वर्षांवरील नागरिकांना 50 टक्के सवलत आणि 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेच्या प्रचंड प्रतिसादानंतर आता ज्येष्ठ नागरिकांना अजून खूष करण्याकरता शिंदे फडणवीस सरकार मोफत देवदर्शन घडवणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश एसटी महामंडळाला देण्यात आले आहेत.
राज्यात तब्बल एक कोटींच्या आसपास ज्येष्ठ नागरिक आहेत. या नागरिकांना मोफत देवदर्शन घडवून आणण्यासाठी आता सरकारकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. या सेवेअंतर्गत प्रत्येक शनिवार आणि रविवार ज्येष्ठ नागरिक मोफत देवदर्शन करू शकणार आहे. यासाठी एसटी महामंडळाकडून तब्बल 2000 बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. या सेवेचा लाभ घेताना फक्त प्रवास मोफत असणार आहे. प्रवासादरम्यान राहण्याचा आणि जेवणाचा खर्च ज्येष्ठ प्रवाशांना स्वतः करावा लागणार आहे.
BIG NEWS
पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रवाशांमध्ये खळबळ
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/6zC87OXWDb#Hellomaharashtra #Pune
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) January 14, 2023
राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर -तुळजापूर- अक्कलकोट, अष्टविनायक दर्शन, शिर्डी, शेगाव, कोल्हापूर, ज्योतिबा दर्शन इत्यादी ठिकाणांना जेष्ठ नागरिकांनी भेटी द्याव्या यासाठी त्यांना हा प्रवास मोफत करता येईल. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.