हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई पाठोपाठ आता पुण्यात शिंदे गटाकडून नवं सेनाभवन उभारण्यात येणार आहे. पुण्यातील सारसबाग परिसरात शिंदे गटाचे नवीन कार्यालय सुरु होणार आहे. पुण्यातील या सेनाभवनाला ‘बाळासाहेबांची शिवसेना भवन’ असं नाव देण्यात येणार आहे.
साधारणपणे 5 हजार चौरस फुटाचे हे शिंदे गटाचे कार्यालय असणार आहे. कार्यालयामध्ये मिटिंग हॉल, पत्रकार परिषद हॉल, जनता दरबार हॉलचे नियोजन करण्यात आलं आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हे कार्यालय 24 तास खुलं असणार आहे. सध्या हे सेना भवन उभारण्यासाठी दिवस-रात्र काम सुरू आहे. यापूर्वी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मुंबईत सेनाभवन उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यांनतर सेनाभवनासाठी निवडलेले पुणे हे दुसरेच शहर आहे.
शिंदे गटाला मिळाले 'हे' चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/fmDNjLy6no#hellomaharashtra @mieknathshinde
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2022
दरम्यान, शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. तर ढाल तलवार हे चिन्ह मिळालं आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं असून मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे.