हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले आहे तर दुसरीकडे शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. मात्र या नावात ठाकरे असा कुठेही उल्लेख नसल्याने विरोधकांनी शिंदे गटाला ट्रॉल करण्यास सुरुवात केली आहे. कारण महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाव सोडून दुसरेही बाळासाहेब आहेत ज्यामध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत नेते बाळासाहेब देवरस यांचा समावेश आहे. याच्यावरून शिंदे गट ट्रोल होत आहे.
बाळासाहेबांची शिवसेना = आरएसएस ची शिवसेना…#मिंदे_गटाचा_मास्टरस्ट्रोक pic.twitter.com/L70BVEluxR
— Adv. Pradnya Pawar (@PradnyaPawar121) October 11, 2022
सोशल मीडियावर नेटकऱ्यानी बाळासाहेब थोरात आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा फोटो शेअर करत बाळासाहेबांची शिवसेना असं कॅप्शन दिले आहे. तर त्याचप्रमाणे एका यूजर्सने बाळासाहेब देवरस यांचा फोटो टाकत त्याखाली बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच आरएसएसची शिवसेना, मिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक असं लिहीत शिंदे गटाला जोरदार ट्रॉल केलं आहे.
बाळासाहेबांची शिवसेना..! @bb_thorat @mieknathshinde pic.twitter.com/lFgjLW8dJ0
— श्रुती महाले (@mahales_) October 10, 2022
एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक आयोगाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहबांची अशा ३ नावांचा पर्याय देण्यात आला होता. त्यातील शिवसेना बाळासाहेब हे नाव निवडणूक आयोगाने त्यांना दिले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या गटाने शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या ३ नावांचा पर्याय दिला होता त्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव त्यांना देण्यात आले.
बाळासाहेबांची शिवसेना 🤣 pic.twitter.com/3eATDfLIwj
— Dr Bharat V. Chavan (@indiacspeaks) October 10, 2022
चिन्हांबाबत बोलायचं झाल्यास उद्धव ठाकरेंच्या गटाला मशाल हे चिन्ह मिळालं असून शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे. दरम्यान, पक्षाला नवीन नाव आणि नवं चिन्ह मिळाल्यांनतर आगामी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे गट आपला उमेदवार उतरवतो का हे आता पाहावं लागणार आहे.