Saturday, March 25, 2023

ठाकरेंची पुन्हा कोंडी? ‘त्या’ चिन्हांवर शिंदे गटाचाही दावा??

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्ताबदल नंतरही शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न अजूनही सुरुच आहे. धनुष्यबाण गोठवल्यांनंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला जी ३ चिन्हे दिली त्यातील २ चिन्हांवर शिंदे गटानेही दावा सांगितला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची पुनः एकदा कोंडी करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्या नंतर उद्धव ठाकरेंनी आयोगाला ३ चिन्हांचा पर्याय दिला आहे. त्यामुळे मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूल यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही उगवता सूर्य आणि त्रिशूल या चिन्हांवर दावा केला असल्याच्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. एकूण परिस्थिती पाहता उगवता सूर्य आणि त्रिशूल हि चिन्हे दोन्ही गटांना नाकारून ते बाद होण्याचीच अधिक शक्यता आहे. या सगळ्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची कोंडी होऊ शकते.

- Advertisement -

फक्त चिन्हच नव्हे तर ठाकरे गटाप्रमाणेच शिंदे गटानेही एकाच नावावर दावा केल्याची माहिती मिळतेय. शिवसेना- बाळासाहेब ठाकरे या एकाच नावावर दोन्ही गटांकडून दावा केला जातो आहे. त्यामुळे निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेते हे आता पाहावं लागणार आहे.