Tuesday, June 6, 2023

तूम्ही “सीएम मटेरियल” आहात त्यामुळे राज्यमंत्र्यांसारखे वागू नका ; मुनगंटीवारांची एकनाथ शिंदेंना कोपरखळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एकनाथ शिंदे साहेब ‘तुम्ही सीएम मटेरियल आहात. त्यामुळे एखाद्या राज्यमंत्र्याप्रमाणे वागू नका’ असं विधान मुनगंटीवार यांनी करताच आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिंदेंमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे, असं थेट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आता सभागृहातच म्हटलं आहे.यामुळे आता खांदेपालट होऊ शकतो का ? असा प्रश्न देखील निर्माण होतोय.

यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी येथील गैरव्यवहारप्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्याला राज्य सरकारकडून वाचवण्यात येत असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला. या प्रकरणाला १५ महिने उलटून देखील अधिकाऱ्यांची कोणतीच चौकशी वा कारवाई गेली जात नसल्याचे सांगत हे सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप मुनगंटीवारांनी केला.

मुनगंटीवारांच्या आरोपांवर एकनाथ शिंदे यांनी भाष्य करत, ‘सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल,’ असा खुलासा केला. त्यावर सुधीर मुनगंटीवार शिंदेंना उद्देशून म्हटले की, साहेब आपण सी.एम.मटेरियल आहात त्यामुळे एखाद्या राज्यमंत्र्या सारखेवागु नका.