हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत.याच पार्श्वभूमीवर अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चाही झाली. या भेटीनंतर शिवसेनेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना शिवसेनेनं पाठिंबा दिला असून दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्येही शिवसेना सहभागी होणार आहे, अशी माहिती अकाली दलाचे खासदार चंदू माजरा यांनी दिली आहे. शिवाय, शरद पवार यांचीही आम्ही भेट घेणार असून ती आज झाली नाही तर दिल्लीत सर्व स्थानिक राजकीय पक्षांच्या बैठकीचे आयोजन करणार असून अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंह बादल या बैठकीचे नेतृत्व करतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Mumbai: A Shiromani Akali Dal delegation met Maharashtra CM Uddhav Thackeray today.
"He said that he'll support all programs of farmers during agitation. He'll also come to the meeting in Delhi two weeks later. He said that he'll support farmers' agitation," says the delegation. pic.twitter.com/xbPxGgfnB8
— ANI (@ANI) December 6, 2020
दरम्यान, सरकारने अजूनही शहाणपणाची भूमिका घेतली नाही तर शेतकरी आंदोलन दिल्लीपुरतं सीमित राहणार नाही असा इशारा शरद पवारांनी केंद्र सरकारला दिला होता. तसेच शरद पवार हे स्वतः यासंदर्भात राष्ट्रपतींशी चर्चा करणार आहेत. 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’