हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कृषी विधेयकांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये फूट पडली आहे. शेतकरी प्रश्नावर आणि कृषी विधेयकावरुन भाजपचा घटक पक्ष शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली आहे. भाजप प्रणित एनडीएचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जुना सहकारी पक्ष शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडला आहे. गेल्या अनेक दशकांची मैत्री तोडत पक्षाने केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
Shiromani Akali Dal (SAD) has decided to pull out of BJP-led NDA alliance because of the centre’s stubborn refusal to give statutory legislative guarantees to protect assured marketing of farmers crops on MSP & its continued insensitivity to Punjabi & Sikh issues: SAD pic.twitter.com/lC3xHczDm2
— ANI (@ANI) September 26, 2020
नव्या कृषी धोरण जाहीर झाल्यानंतरच अन्नप्रक्रीया मंत्रीपदावरून हरसिम्रत कौर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. आता शिरोमणी अकाली दल एनडीएतून वेगळे झाले आहेत. अकाली दलने लोकसभा आणि राज्यसभेत या विधेयकांचा विरोध केला होता. भाजप आणि अकाली दल मागील २२ वर्षांपासून सोबत आहेत. दरम्यान, शिरोमणी अकाली दल बाहेर पडल्यानंतर भाजपची चिंता वाढलेली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’