वरळी प्रतिनिधी |
शिवसेना-भाजप यांच्या युती संदर्भात वरळी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि,”राष्ट्रीय विचारांचे पक्ष एकत्र यावे अशी जनभावना होती याचा मान राखून आम्ही एकत्र एकत्र येत आहोत.” भाजप-शिवसेना लिक्सभा आणि विधानसभेसह सर्व आगामी निवडणूक युतीने लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.
आम्ही दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी आहोत. भाजप- शिवसेनेची २५ वर्षांची युती आहे.आमच्यात काही मतभेद असले तरी मात्र आमचा मूळ विचार सारखा आहे त्यामुळेच आम्ही परत एकत्र आलो आहोत. आणि युतीने आगामी निवडणूक लढवणार आहोत,असे मुख्यमंत्री म्हणाले.लोकसभा निवडणुकीत ४८ जागांपैकी भाजप २५ जागा आणि शिवसेना २३ जागा लढवेल असे जागा वाटप झाले आहे.
पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी अनेक मुद्दे मांडले त्यावेळी ते म्हणाले की,” ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, आहे बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही काही निर्णय घेत आहोत.” जनहितासाठी आम्ही एकत्र येत आहोतआणि जनहितासाठी सर्व प्रयत्न आम्ही युतीने करणार आहोत असे त्यांनी सांगितले.
नानार येथील लोकांच्या पाठीशी आम्ही आहोत. लोकांची जेथे मान्यता असेल तेथे हा प्रकल्प उभारला जाईल,असे त्यांनी सांगितले. तसेच मुंबई येथे ५०० स्केवर फूट पेक्षा कमी जागा असणाऱ्या लोकांचा टॅक्स बंद केले जाईल तसेच अनेक लाभकारी उपक्रम राबविले जातील.
इतर महत्वाचे-
व्हिएन्ना कराराच्या अटींवरून पाकिस्तानला अडचणीत आणण्याचा प्रयत्न
‘गोली का जवाब गोली से’ जवानांना बीजेपीची साथ
आम्हाला चार जागा देणारे तुम्ही कोण? प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल