अकोल्यात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया पराभूत, भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला, वाशिम, बुलडाणा येथील स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. दरम्यान, या निवडणुकीत अकोला, वाशिम, बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली यामध्ये भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला आहे.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांना 438 तर शिवसेनेचे उमेदवार गोपिकिशन बाजोरिया यांना 328 मते मिळालेली आहेत. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. यामध्ये गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाला आहे.

अकोला – बुलडाणा – वाशिम या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे बहुमत नव्हते. अकोला – बुलडाणा – वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना चांगलाच रंगला आहे.