मोहोळमधून शिवसेनेची नवनाथ क्षीरसागर यांना उमेदवारी ; मातोश्रीवरून एबी फॉर्म रवाना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा भाजपच्या वाट्याला जाईल अशी चर्चा होती. मात्र शिवसेनेने या मतदारसंघावर आपला हक्क सांगत हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मोहोळ मतदारसंघात नवनाथ क्षीरसागर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. अधिकृत उमदेवार म्हणून उमेदवारी अर्जाला जोडण्यात येणारा पक्षाचा एबी फॉर्म नवनाथ क्षीरसागर यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सूत्रांनी दिली आहे.

मोहोळ विधानसभा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हा मतदारसंघ २००८ साली झालेल्या मतदारसंघ फेररचेत राखीव झाला आहे. त्यामुळे येथून राजन पाटील घराण्याचे वर्चस्व संपुष्ठात आले आहे. घराण्याचे वर्चस्व संपुष्ठात आले असले तरी राजन पाटील यांनी या मतदारसंघात पकड मात्र ढिल्ली होऊ दिली नाही. त्यांच्या मर्जीचा माणसाला येथून आजही राष्ट्रवादीची उमेदवारी दिली जाते आणि तोच व्यक्ती या ठिकाणी आमदार होतो असे चित्र मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये बघायला मिळाले आहे.

नवनाथ क्षीरसागर यांनी गेल्यावेळी भाजपमध्ये जात मोहोळ विधानसभा भाजपकडून लढवली होती. मात्र राष्ट्रवादीच्या रमेश कदम यांनी त्यांचा पराभव केला होता. आता नवनाथ क्षीरसागर हे शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार झाले आहेत.

Leave a Comment