हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खातेबद्दल केले करण्यात आले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावं अशी अनेकांची इच्छा होती. मात्र, काहींना डावलून काहींना संधी देण्यात आली. यामध्ये सर्वाधिक चर्चा हि पंकजा मुंडे यांच्या बहीण भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांच्या नावाची होत आहे. त्यांना मंत्रिपद दिले गेले नसल्याने यावरून शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “फडणवीसांनी मुंडेंचे पंख छाटले तर खडसेंना बाद केलं; मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्याना त्यांनी संपवलं,” अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी केली आहे.
भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरून शिवसेनेने भाजपवर टीका करण्याची संधी साधली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने पंकजा यांचे पंख छाटले. एकनाथ खडसे यांना बाद केले, असं सांगतानाच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते. त्यांना राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम फडणवीसांनी केल्याचे म्हंटले आहे.
भाजपमधील मुंडे बहिणींमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील न मिळालेल्या स्थानावरून नाराजी पसरल्याचे चित्र दिसल्यानन्तर याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आसा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले आहे. मात्र, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर त्यांच्या टीकेला फडणवीस काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.