शिवसेनेच्या संजयचा पराभव : राज्यसभेवर धनंजय महाडिकांची दुसऱ्या फेरीत बाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली | राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीत महाविकास आघाडी आणि भाजपाने प्रत्येकी 3 जागांवर विजय मिळविला आहे. परंतु चुरशीच्या व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या 6 व्या जागेवर भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली आहे. कोल्हापूरच्या दोन पैलवानांच्या या कुस्ती शिवसेनेच्या संजय पवारांना जोरदार दगफटका बसलेला आहे. तर हा पराभव काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना जिव्हारी लागणारा असणार आहे.

शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे, पीयूष गोयल आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत.

मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत.

शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 32, तर भापजचे उमेदवार धनंजय महाडिक यांना 25 मतं मिळाली.

खरी चुरस होती ती सहाव्या जागेसाठी. तेथे कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातील शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात चुरशीची लढत होती. या लढतीवर अनेक पैजाही लागल्या होत्या. अखेर मतमोजणीच्या दुसर्‍या फेरीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली.

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे ः पीयूष गोयल (48), अनिल बोंडे (48), प्रफुल्‍ल पटेल (43), इम्रान प्रतापगढी (44), संजय राऊत (42), धनंजय महाडिक (41). पहिल्या फेरीत संजय पवार यांना 33 तर धनंजय महाडिक यांना 27 मते मिळाली होती.
धनंजय महाडिक दुसर्‍या फेरीत विजयी झाले. त्यांना 41 मते, तर शिवसेनेच्या संजय पवार यांना 33 मते मिळाली.

Leave a Comment