व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भारताला मोठा धक्का ! Mary Kom ची दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑलिम्पिक मेडलिस्ट बॉक्सर मेरी कोमला (Mary Kom) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी होणाऱ्या निवड चाचणी स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. 48 किलो वजनी गटातील पहिल्या फेरीत नितू विरुद्धच्या सामन्यात मेरीच्या (Mary Kom) डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तिला हा सामना अर्ध्यावर सोडून हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले आहे.

सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या मेरीला (Mary Kom) आता पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत होता येणार नाही. हरयाणाच्या नितूने चाचणी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या 39 वर्षीय मेरीने (Mary Kom) दुखापत झाली असूनही काही काळ सामन्यात संघर्ष दाखवला,परंतु तिला संतुलन राखणे अवघड होत होते. त्यामुळे तिला रिंगमधून स्ट्रेचवरून रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर रेफरीने नितूला विजयी घोषित केले.

हे पण वाचा :
आता सहकारी बँकांकडून घेता येणार 1.40 कोटी रुपयांपर्यंतचे होम लोन, RBI ने वाढवली मर्यादा

चालत्या ट्रेनमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक

आता ICICI Bank च्या फिक्स डिपॉझिटवर मिळणार जास्त व्याज !!!

IND vs SA T-20 : टीम इंडियाला दुसरा धक्का, केएल राहुल नंतर ‘हा’ खेळाडू टीममधून बाहेर

खुशखबर !!! Credit Card युझर्सना आता UPI द्वारेही करता येणार पेमेंट