हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे व शिवसेनेतील ठाकरे घराणे यांच्यातील वाद हा सर्वांना माहिती आहे. ठाकरे घराण्याचे नाव जरी निघाले तरी राणे तुटून पडतात. दिशा सालियन प्रकरणावरून नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणेंनी केलेल्या टीकेवरून शिवसेना (उद्धव ठाकरे) च्या महिला नेत्याने नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.
शिवसेना उपनेत्या संजना घाडी यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला असून त्यांनी नितेश राणेंना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्यापेक्षा नारायण राणेंची नार्को टेस्ट करावी. आणि राणेंची नार्को टेस्ट केल्यास मशीन बिघडून जाईल.
विशेष म्हणजे दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणे आणि निलेश राणे यांनी अनेकवेळा वक्तव्ये केलेली आहेत. त्यामुळे त्या दोघांचीच पहिल्यांदा नार्को टेस्ट झाली पाहिजे. तसेच, कधी काँग्रेस, कधी भाजप, तर कधी शिवसेनेला यांनी शिव्या घातल्या. नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीन बिघडून जाईल. त्यामुळे याविषयावर बोलायला त्यांना लाज वाटली पाहिजे, अशी टीकाही घाडी यांनी केली.