संयमाने वागला असता तर आज 56 आमदार भाजपसोबत असते; गुलाबराव पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यांच्यांकडून शिवसेना, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांच्या टीकेला शिवसेना नेते गुलाबराव पाटीलांनी टोला लगावला आहे. ” पाटील जर संयमाने वागले असते, त्यांनी टीका केली नसती तर आज त्यांच्यासोबत56 आमदार असते, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पंढरपूर येथे जाऊन आज श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपचे चंद्रकांत पाटील काही ना काही टीका करतात. त्यावेळेस ते संयमाने वागले असते तर शिवसेनेचे 56 आमदार भाजपसोबत दिसले असते

शिवसेनेचा दसरा मेळावा हा खूप मोठा असतो. या मेळ्याव्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व शिवसेना बांधवाना संबोधित करतात. मात्र, भाजपमधील नेत्यांकडून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका केली जात आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करणे म्हणजे उंदराने काहीतरी चिंधी पकडणे होय, अशी टीका मंत्री पाटील यांनी भाजपवर केली.

You might also like