हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त असे विधान केले. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. दरम्यान, शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणे हा महाराजांचा अपमान आहे. याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी. अंधभक्ती किती असावी. चंद्रकांत पाटील यांचं डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केला आहे.
मनीषा कायंदे यांनी ट्विट करीत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदूं वोट बँकवर अटलजी आणि मोदींनी कळस चढवला असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊच शकत नाही. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. अशी मागणी आम्ही करीत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदूं वोट बँकवर अटलजी आणि मोदींनी कळस चढवला:-चंद्रकांत पाटील
प्रधानमंत्री #नरेंद्रमोदी व छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊच शकत नाही त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील @ChDadaPatil यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी आम्ही करीत आहोत !! @BJP4India pic.twitter.com/EFh4ybHrtg— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) December 15, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणे हा महाराजांचा अपमान आहे. याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी. अंधभक्ती किती असावी. चंद्रकांत पाटलांचं डोकं ठिकाणावर आहे का? आसा सवालही यावेळी कायंदे यांनी केला आहे.