मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला आहे. शिवसेनेच्या 45 पेक्षा जास्त आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे जवळचे कट्टर कार्यकर्ते आणि माहिम-दादर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर हेसुद्धा आता नॉट रिचेबल आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते देखील शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याशिवाय शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी ख्याती असलेले नेते आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हेसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गोटात जावून शामील झाले आहेत.
शिवसेनेचा 'हा' ढाण्या वाघ गुवाहाटीतल्या बंडखोर आमदारांना जावून मिळाला, हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा व्हिडिओ आला समोर pic.twitter.com/cdQdoBa6Mx
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 23, 2022
शिवसेनेचे बंडखोर आमदार कालपर्यंत सुरतच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. त्यानंतर आज पहाटे त्यांचं एअर लिफ्टिंग करुन त्यांना गुवाहाटीत नेलं गेलं. या सर्व आमदारांची राहण्याची व्यवस्था ही गुवाहाटीमधील ‘रेडीसन ब्लू’ हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये शिवसेनेचे 45 पेक्षा जास्त आमदार आहेत. यामध्ये आता गुलाबराव पाटीलसुद्धा (Gulabrao Patil) सामील झाले आहेत. गुलाबराव (Gulabrao Patil) हे शिंदे यांच्या गोटात गेल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. याच ऑफरची माहिती देण्यासाठी गुलाबराव (Gulabrao Patil) गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये गेले आहेत. पण गुलाबराव (Gulabrao Patil) यांचा त्या हॉटेलमध्ये प्रवेश करताना व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत गुलाबराव जेव्हा एकनाथ शिंदे यांना भेटतात तेव्हा ते त्यांचा पाया पडताना दिसत आहेत. त्यामुळे गुलाबरावही (Gulabrao Patil) शिंदेंच्या गोटात सहभागी झाले की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे आमदार सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर हे नॉट रिचेबल आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. शिवसेनेचे सर्वच आमदार शिंदे यांच्या गोटात गेले तर मग महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार आहे हे लवकरच स्पष्ट होईल.
हे पण वाचा :
भरमंडपात मेहुणीने केली नवरदेवाची धुलाई, नेमके काय घडले ?
खुशखबर !!! Indusind Bank कडून फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ !!!
विमान प्रवासादरम्यान महिलेने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य, Video पाहून भडकले नेटिझन्स
प्लॅस्टिक पाईप बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!
County Cricket : ‘या’ भारतीय खेळाडूला लँकशायर क्लबने केले करारबद्ध