एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला आला हृदयविकाराचा झटका

0
204
Eknath Shinde Shiv Sena
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे त्यांच्या २५ हुन अधिक आमदारांसह गुजरातमध्ये आहेत. दरम्यान शिंदे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. या घडामोडीत शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावरती सुरतच्या हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत.

विधान परिषद निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतरपासूनच एकनाथ शिंदे आपल्या ३० हुन अधिक आमदारांना सोबत घेऊन सुरत या ठिकाणी गेले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे नितीन देशमुख, शहाजी बापू पाटील, महेश शिंदे , भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेश थोरवे, विश्वनाथ भोईर, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदयसिंह राजपूत, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार आदी आमदार सुरत या ठिकाणी मुक्कामी होते.

दरम्यान सुरतमध्ये दाखल झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास आमदार नितीन देशमुख यांच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर गंभीर अवस्थेत आमदार देशमुख यांनी सुरत येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. नितीन देशमुख यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. आमदार देशमुख यांना रुग्णालयात दाखल करताच या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here