हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईत आजपासून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. राणेंनी यात्रेच्या सुरुवातीलाच शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. राणेंच्या हल्लबोल नंतर शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली असून “आम्हाला पक्षाचे कोणतेही तसे आदेश नाहीत. बाळासाहेबांपुढे नतमस्तक व्हायला कुणी येत असेल तर त्याला का करायचा, असे आमदार सदा सरवणकर यांनी म्हंटले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन-आशिर्वाद यात्रेला सकाळी साडे अकरा वाजता सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी मंत्री राणे म्हणाले की, “जनता आताच्या सरकारला कंटाळलेली आहे. हे सरकार कोणत्याही प्रकारचा जनतेचा विकास करू शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या सत्तेला जनता कंटाळलेली आहे, अशी टीकाही राणेंनी केली आहे. यावर शिवसेना आमदार शिवसेना आमदार सदा सरवणकर म्हणाले की, “नारायण राणे यांना विरोध करायचा की त्यांना स्मृती स्थळावर दर्शन येऊ द्यायचं याबाबतीत पक्षाकडून अद्याप कुठलेही आदेश आलेले नाहीत.
मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन-आशिर्वाद यात्रेला सकाळी साडे अकरा वाजता सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखविला.