नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद म्हणजे बुडत्याला काडीचा आधार : अरविंद सावंत यांची टीका

0
35
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीवरून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज निशाणा साधला. यावरून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राणेंवर जोरदार टीका केली. “ज्या नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. अशा या बुडत्याला काडीचा आधार असलेल्यांनी शिवसेना, महाविकास आघाडी सरकारवर टीका करू नये,” अशा शब्दात सावंत यांनी राणेंवर टीका केली.

भाजपनेते नारायण राणेंनी केलेल्या टीकेवर खासदार सावंत म्हणाले कि, आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करतोय. जे नारायण राणे संपलेल्या लोकांबरोबर राऊत जातायत असे म्हतायत. त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, तेही संपलेले होते ना. तुम्हाला दोनदा लोकांनी पराभूत केले आहे हे तुम्ही विसरू नये. त्यामुळे हेच ज्या पक्षात कुजत त्या पक्षाची सत्ता राहत नाहीत. हीगोष्ट लक्षात घ्यावी, असे सावंत यांनी म्हंटले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिल्लीत माध्यमांशी आज संवाद साधताना काँग्रेस, महाविकास आघाडी सरकार, संजय राऊत व राहुल गांधी यांची भेट या मुद्यांवरून आरोप केला होता. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही हल्लाबोल केला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेली दहा हजाराची मदत हि लोकांनी पिंपात टाकलेत भिजत. ते लवकर उद्धव ठाकरे यांच्या नावाने वर येतील, अशा शब्दात राणेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here