उद्धव ठाकरेंनी शिंदेंशी बोलून भाजपशी युती करावी; शिवसेना खासदाराच मोठं वक्तव्य

Eknath Shinde Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे फडणवीसांचे सरकार आल्यानंतर आता शिवसेनेनेही भाजपशी मिळतेजुळते घ्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांकडून केली जाऊ लागली आहे. काही खासदारांनी तरबंडाची तयारीही केली आहे. अशात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी भाजप शिवसेना युतीबाबत मी,मोठं विधान केले आहे. “शिवसेना भाजप नैसर्गिक युती हि होणे गरजेची आहे. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून मार्ग काढावा,” असे गोडसे यांनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरे यांचे समर्थक शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजप व शिवसेनेची यापूर्वी नैसर्गिक युती होती. ती अजूनही पुढे राहावी. आता यापुढे विधानसभेच्या ज्या निवडणूक येतील तेव्हा महाविकास आघाडी हि आपल्यासाठी अडचणीची ठरणार आहे. त्यामुळे जोपर्यंत महाविकास आघाडी आहे. तोपर्यंत शिवसेना पक्षाला अडचणीचे ठरणार आहे.

पंचवीस वर्षाचा युतीचा जो काही अनुभव आहे आणि आताचा अडीच वर्षाचा युतीचा जो काही अनुभव आहे. हा अनुभव पाहता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलावे आणि मार्ग काढावा, असेही गोडसे यांनी म्हंटले.