शेतकऱ्यांचा आवाज दाबणे हि भाजपची अधिकृत भूमिका आहे का? राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांकडून देशभर आंदोलने केली जात आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील लखीमपुरात शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरून शिवसेना खासदार खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांमध्ये मोदी सरकार विरोधात प्रचंड रोष आहे. “मोदी सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार केला जात आहे. हीच खरी भाजपची अधिकृत भूमिका आहे का? असा सवाल राऊतांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपुरात शेतकरी आंदोलनात घडलेल्या घटनेवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, देशात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी पंगा घेऊ नका. पंगा घ्यायचा असेल तर खुशाल शेतकऱ्यांना विरोध करा मग बघा देशभरात काय होईल तेही पाहा. त्यांना ब्रिटीश सरकारसारखी वागणूक तुम्ही देत आहात.

यावेळी राऊतांनी मोदी सरकारवर घणाघाती टीकाही केली. ते पुढे म्हणाले की, “मोदी सरकारच्या विरोधात देशातील शेतकरी लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहेत. उत्तर प्रदेशात सध्या आंदोलनांना चिरडण्याची नवी प्रथाच सुरू झाली आहे. आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यापासून प्रियांका गांधींना रोखण्यात आले आहे. हा प्रकार खूप गभाईर असल्याचे राऊत यांनी यावेळी म्हंटले.

Leave a Comment