हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच ऑक्सीजन अभावीही काही लोकांना आपला जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे केंद्र सरकारने लेखी सांगितल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. संताप व्यक्त करताना राऊत यांनी म्हंटलंय की, केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. केंद्र सरकार भ्रमिष्ट असल्यासारखे वागत आहे. जे रुग्ण ऑक्सीजनभावी मृत्युमुखी पडले आहेत. त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारविरोधात खटला दाखल करावा, असे आवाहन केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्रावर चांगलाच परिणाम झाला. या लाटेत ऑक्सीजनभावी अनेक लोकांचा मृत्यू झाला. याला महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरले गेले. राज्य सरकारकडून अजून मृत्यू टाळण्यासाठी राज्य सरकारने ऑक्सीजन प्लॅन्ट निर्मितीचा निर्णय घेतला. अशा परिस्थिती मात्र, केंद्र सरकारकडून धक्क्कादायक माहिती देण्यात आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात ऑक्सीजन अभावी एकाही रुग्नाचा मृत्यू न झाल्यास केंद्राकडून सांगितले आहे.
राज्यशासित व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूच्या एकाही घटनेची नोंद झालेली नाही, अशी माहिती केंद्राकडून राज्यसभेत देण्यात आली. केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनंतर राऊत यांनी संताप व्यक्त करताना म्हंटले आहे कि, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्नांचे नातेवाईक ऑक्सीजनचे टँक हेरून पळताना दिसले. ऑक्सीजनचा तुटवडा भासल्यामुळे राज्यात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. अशा भयानक घडलेल्या घटनेनंतर आता केंद्र सरकार लिहून देतंय कि, महाराष्ट्रात ऑक्सीजन अभावी एकही रुग्ण दगावलेला नाही. वास्तविक हे केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. या भ्रमिष्ट झालेल्या केंद्र सरकारविरोधात ऑक्सीजनअभावी मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी न्यायालयात खटला दाखल करावा.