हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेनेचा आज दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख्य उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्व भूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. शस्त्र कधी आणि कुठे काढायची असतात, हे मुख्यमंत्री ठाकरेंना चांगले माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणातून कळेल,” असे राऊत यांनी म्हंटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आज केले जाणारे भाषण हे महत्वाचे असणार आहे. महाराष्ट्र आणि देशात अनेक घटना घडल्या आहेत. यावेळी शिवतीर्थावर दसरा मेळावा होऊ शकत नाही. पण सर्व नियमाचं पालन करून मेळाव्याचे आोयजन करण्यात येत आहे. शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारे काम होईल.
आतापर्यंत घडलेल्या घटना. विरोधकांकडून करण्यात आलेले राजकारण याचे उत्तर मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजच्या दसरा मेळाव्यात देणार आहेत. त्यांना चांगले माहिती आहे की, शस्त्र कधी, कुठे काढायची असतात, असे म्हणत राऊतांनी भाजपला टोला लगावला. तसेच राऊतांनी यावेळी महत्वाचे विधानही केले आहे. शिवसेनेकडून राज्य तसेच राष्ट्रीय राजकारणात आपलं स्थान बळकट करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आहेच. भविष्यात आमचे 23 खासदार होतील, असे राऊत यांनी म्हंटले आहे.