अमित शाहा जम्मू काश्मीरला गेलेत काय, तिकडेच थांबायला सांगा; संजय राऊतांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू काश्मिर दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शाह यांना टोला लगावला आहे. “देशाचे गृहमंत्री तिकडे जाऊन थांबले आहेत. तिकडे जाऊन तर नक्कीच अतिरेक्यांवर दबाव येईल आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना, आर्मीला, पोलिसांना पाठबळ मिळेल’, त्यांना तिकडेच थांबायला सांगा, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काश्मिर दौऱ्यावर आहेत. हि चांगली गोष्ट आहे. त्यांनी तिथेच राहावं काही दिवस. अनंतनाग, श्रीनगर, बारामुल्ला, गुलमर्ग या भागात मोठ्या प्रमाणात दहशतवाद सुरु आहे. देशाचे गृहमंत्री तिकडे जाऊन थांबले आहेत. तिकडे जाऊन तर नक्कीच अतिरेक्यांवर दबाव येईल आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना, आर्मीला, पोलिसांना पाठबळ मिळेल,” असे राऊत यांनी म्हंटले आहे.

यावेळी राऊत पुढे म्हणाले की, देशाबाहेरील हिंदू असेल किंवा काश्मिरमधील हिंदू असेल, त्यांचे संरक्षण करणे हे केंद्र सरकारचे काम आहे. मला दारिद्र्याची व्याख्या समजून घ्यायला हवी. आम्ही म्हणतोय हिंदुंचं रक्षण करा, आम्ही म्हणतोय बांग्लादेशातील हिंदुंना संरक्षण द्या, असेही राऊत यावेळी म्हणाले.